“शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रित संतुलन म्हणजे योग.”-सौ.स्वाती कणसे
दौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी २१ जून रोजी “आंतरराष्ट्रीय योग” दिन जगभर साजरा केला जातो या दिवशी योगाभ्यासाचे महत्त्व त्याचे शरीरावर व मनावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच योगाच्या माध्यमातून होणारी आत्मिक उन्नती यावर विशेष भर दिला जातो .
योग दिनानिमित्त प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून सोनाली मुनोत, योगा प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक श्री .विशाल पवार सर ,वृषाली माने , मॅडम विद्या घडशी मॅडम, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि योग दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रशालेतील शाळेतील शिक्षकांही या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध योगासने केली. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे मॅडम , उपमुख्याध्यापिका सौ.नीलम अग्रवाल मॅडम आणि शिक्षक उपस्थित होते .
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना” आजच्या धावपळीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो” “शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रित संतुलन म्हणजे योग.” अशी माहिती दिली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.