तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंडचा दमदार विजय

१४ वर्षांखालील मुलांचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी

दौंड : जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या वतीने नुकतीच आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंडच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी संघभावना, शिस्त, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावणारी आहे.”स्पर्धेत अंश शिंदे, श्रवण दाते, आर्यन जाधव, प्रज्योत अभ्यंकर, दीपांशु जाजीमोगा, योगराज खताळ, वरद खलदकर, यश कुमार, मीत आवटे, प्रसन्न तिजारे, वीर पिंपरले व शिवम मोकाटे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळ करत संघाचे प्रतिनिधित्व केले. उपमुख्याध्यापिका नीलम अग्रवाल, प्रशासन विभागप्रमुख नितीन करे, क्रीडा विभागप्रमुख विशाल पवार, वृषाली माने व विद्या घडशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामागे शाळेतील क्रीडा संस्कृती, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत आहे. भविष्यात हे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरही आपली छाप सोडतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.

Leave a Comment

Read More