दौंड येथे PTS परीक्षा 2025 प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

ज्याचं अभ्यासातील गणित चुकले, त्याचे आयुष्याचे गणित चुकले” – रामचंद नातू सरांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन

दौंड : दौंड तालुका गणित अध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या PTS परीक्षा 2025 प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभ दौंड येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद गायकवाड सर, संपादक श्री. रामचंद नातू सर, माजी सहसंपादक श्री. विनायक सुंबे सर, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. उत्तम जावळे सर, पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे प्रतिनिधी श्री. रत्नाकर भिसे सर, सरस्वती विद्यालय रावणगावचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय इवरे सर, जिजामाता विद्यालयाचे सहशिक्षक व ‘चांडाळ चौकडी’ मालिकेतील अभिनेते श्री. गणेश लोणकर, तसेच दौंड तालुका गणित अध्यापक संघाचे सदस्य, विविध शाळांतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. प्रसाद गायकवाड सर, श्री. रामचंद नातू सर व श्री. उत्तम जावळे सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसंपादक श्री. रामचंद नातू सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना ठाम शब्दांत सांगितले, “ज्याचं अभ्यासातील गणित चुकले, त्याचे आयुष्याचे गणित चुकले.” तसेच करिअर मार्गदर्शक श्री. अभिनव सिंग यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून प्रमाणपत्र व क्रिएटिव्ह कॉम्प्युटरचे संचालक श्री. उल्हास मिसाळ सर यांच्या सौजन्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. उपस्थित विद्यार्थी व पालकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय आढाव सर यांनी तर प्रास्ताविक श्री. बाबासो सांगळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दौंड तालुक्यातील सर्व गणित अध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

Read More