दौंड तालुक्यात गुणवत्ता विकास कार्यशाळा संपन्न

उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम

दौंड (ता.२८) – पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती दौंड (शिक्षण विभाग) अंतर्गत तालुकास्तरीय गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा श्री. कृष्ण मंगल कार्यालय, चौफुला येथे दि. २८ऑगस्ट रोजी पार पडली. या कार्यशाळेचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी मा. संजय महाजन यांनी केले. कार्यशाळेत विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी “उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम” या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. दौंड विकास गटात २०२३-२४ व २०२४-२५ या दोन शैक्षणिक वर्षांत नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी झाल्याचे नमूद करण्यात आले.या कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या नवसाक्षर श्रीमती नंदा चौधरी (हरिबाची वाडी) व श्रीमती कमल जाधव (भागवतवाडी) यांना प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तालुक्याचे उद्दिष्ट १७९१ पैकी आजअखेर ८०० पूर्ण झाले असून, उर्वरित उद्दिष्ट एका आठवड्यात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच सर्व शाळांमध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडल्याचेही सांगण्यात आले. या विषयावर तालुका समन्वयक श्री. दत्तात्रय कुदळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच इतर विविध शैक्षणिक विषयावर सोमनाथ बंड, संभाजी कुंभार, प्रकाश भगत, शकील पठाण यांनी मार्गदर्शन केले व रहीम शेख यांनी सूत्रसंचालन केले.केंद्रप्रमुख संजय चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Comment

Read More