विद्यार्थ्यांनी बालपणातच आपली ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्नशील रहावे- प्राचार्या स्वाती कणसे
दौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड प्रशालेत बालदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरुंचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून झाली.
दैनंदिन शालेय परिपाठ प्रशालेतील शिक्षकांनी सादर केला .बालकांना प्रेरणादायी असे गीत प्रशालेतील शिक्षक अतुल चौधरी सर यांनी सादर केले तर राहुल हतागळे सर, जिजा सावंत मॅडम या प्रशालेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रशालेतील संगीत शिक्षक संजय मोरे सर यांनीही बालदिनानिमित्त बालगीत सादर केले . इयत्ता पहिली व दुसरी या वर्गांना शिकविणाऱ्या महिला शिक्षिकांनी या कार्यक्रमादरम्यान बालगीतांवरती नृत्य सादर केले यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साहात वाढ झाली .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे गंमतीदार उपक्रम प्रशालेतील अवंतिका नाईक मॅडम यांनी घेतले .इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीही बालगीतावरती नृत्य सादर केले . बाल दिनानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू ही देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान शिक्षक विद्यार्थ्यांनी ही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम व शिशुविभागाचे प्रमुख सौ .शकुंतला तोरस्कर मॅडम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले बाल वयातच विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत तसेच व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची जडणघडण ही बालवयापासूनच होत असते.व्यक्तीच्या जीवनामध्ये बालपणाचे महत्त्वाचे स्थान आहे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद मनोडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेश्मा मनोडे मॅडम यांनी केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. (द महाराष्ट्र न्युज टीम दौंड)