दौंड तालुक्यातील 11 परीक्षा केंद्रावर 4565 विद्यार्थी देणार दहावीचा मराठीचा पेपर..

अनेक परीक्षा केंद्रावर गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…!

श्री विनोद गायकवाड सहसंपादक द महाराष्ट्र न्युज दौंड

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे… दौंड तालुक्यातील एकूण 11 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत असून तालुक्यातील 11 परीक्षा केंद्रावर दहावीचे 4565 विद्यार्थी आज मराठीचा पहिला पेपर देत आहेत… कुरकुंभमधील श्री फिरंगाईमाता विद्यालय या दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या

Leave a Comment

Read More