पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड मध्ये विद्यार्थी प्रतिनिधीचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात साजरा

द महाराष्ट्र न्यूज टीम दौंड

दौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड मध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड भारतीय लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन हे श्री .तुषार बोरकर सर (नायब तहसीलदार दौंड) यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्रशालेतील संगीत शिक्षक श्री.संजय सर व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रशालेत निवडून आलेले एकूण ३१ कौन्सिल सदस्य आहेत. या प्रतिनिधींना त्यांच्या पदांचे ग्रहण करताना सामूहिक शपथ देण्यात आली. याचवेळी या विद्यार्थी प्रतिनिधींना बॅचेस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी मधील हेड बॉय जीशान पठाण तर हेड गर्ल समर्था खळदकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडण्याचे वचन दिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तुषार बोरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावा व त्याचा वापर देशाच्या उज्वल भविष्यासाठी करावा असे प्रतिपादन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे मॅडम , उपमुख्याध्यापिका सौ.नीलम अग्रवाल ,शिशुविभागाचे प्रमुख सौ शकुंतला तोरस्कर, प्रशासक श्री स्वप्नील जुमडे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी पालकही उपस्थित होते उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना” शैक्षणिक वर्षात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य याविषयीची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी ईशान वागजकर आणि विद्यार्थिनी सुहानीका बैरवा
यांनी केले . तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवांशी मगर हिने केली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Leave a Comment

Read More