१००% निकालाची यशस्वी परंपरा कायम.
दौंड – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच बोर्डाने जाहीर केला त्यात पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड प्रशालेतील 79 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली
प्रशालेतील उज्वल यशाचे मानकरी –नैतिक पाटील( ९६.४०%), सिद्धेश धनगर (९४.८०%), मृण्मयी भागवत(९३.००%), संस्कृती बनकर (९१.८०%), प्रियदर्शिनी भोंग(९१.८०%), अभय प्रजापती (९०.६०%), श्रद्धा तांबे (९०.६०%), अथर्व पठारे (९०.४०%), कृष्णा पठारे (९०.००%) हे आहेत.
यश हे फक्त एक गुण नाही तर कठोर परिश्रम, समर्पण आणि विश्वासाची कथा आहे.” प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम, मेहनत, आत्मविश्वास आणि अचूक मार्गदर्शनांद्वारे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. नीलम अग्रवाल तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वाती कणसे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.