दहावी व बारावी विद्यार्थ्यांना दिलासा
दाखले वाटप शिबिर – 19,20 व 21 मे 2025
दौंड -शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन व सेंट्रलाइज पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म भरता येणार आहे. तसेच इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी व विद्यार्थ्याना आपले दाखले स्थानिक स्तरावर शाळेतच मिळावे या उद्देशाने दौंड तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावी शालेय विद्यार्थ्यांचे अत्यावश्यक दाखले शालेय स्तरावर वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे
दौंड तहसील कार्यालयामार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सक्ती दाखल्यांचे (जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र इत्यादी) वाटप शिबिराचे आयोजन वार सोमवार ते बुधवार दिनांक १९/०५/२०२५ ते २१/०५/२०२५ या दिवशी करण्यात येणार आहे. या विशेष शिबिरात विद्यार्थ्यांना शाळेमार्फत प्रस्तावित व तपासलेल्या अर्जांच्या आधारे त्यांचे अत्यावश्यक दाखले वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी वेळेत उपस्थित राहून दाखले घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या शिबिराचे ठिकाण, वेळ आणि संबंधित शाळांसोबत समन्वय साधून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शाळेचे कार्यालयीन कामकाज चालू ठेवण्याच्या सूचना शाळा प्रशासन यांना देण्यात आल्या आहेत या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे