दौंड-श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडिअम स्कूल कुरकुंभ येथे संविधान वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले
भारत देशातील प्रत्येक नागरिकाच्या हिताचा ,सुखाचा, त्याच्या जीवन कल्याणाचा विचार भारताच्या संविधानामध्ये मांडलेला आहे. या अर्थाने भारताचे संविधान समग्र भारतीय जनतेचा खरा सुखकर्ता व दुःखहर्ता आहे .भारताचे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आनंदी ,सुखी, संपन्न जीवनाचे सुरक्षा कवच आहे .ही संविधानाप्रतीची जाणीव सर्व भारतीय नागरिकांच्या मनामध्ये अंकुरण्यासाठी ,उमलण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून आज श्री फिरंगाईमाता इंग्लिश मीडियम स्कूल ,कुरकुंभ या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मुलांकडून व शिक्षकांकडून संविधानाचे वाचन करण्यात आले
त्यानंतर पहिली ते चौथीच्या विद्याथ्यानी संविधानातील एक एक कलमाचे वाचन केले व त्याच संविधानातील कलमाची माहिती शिक्षकांमार्फत देऊन संपूर्ण देशाला संविधानाची अत्यंत गरज आहे हे पटवून देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रशालेतील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला
( द महाराष्ट्र न्युज टीम दौंड)