जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडून कौतुक
मोखाडा (दि.30) कुलदीप जाधव प्रभारी गटविकास अधिकारी तथा महिला बालविकास अधिकारी पंचायत समिती मोखाडा येथे कार्यभार सांभाळत असताना मोखाडा तालुक्याची जबाबदारी चार वर्ष अतिशय मनमिळावू आणि सर्व कर्मचाऱ्यांसोबत प्रेमाने राहून आपले नेतृत्व पंचायत समितीमध्ये प्रस्थापित केले त्यांची बदली झाल्याने पंचायत समितीच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्मानीय प्रकाश निकम यांनी “कुलदीप जाधव गटविकास अधिकारी लय भारी” अशा शब्दात त्यांच्या कामाचे कौतुक केले कुलदीप जाधव हे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व आहे मोखाड्यात कार्यरत असताना आयुष्यातील चार वर्ष कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावून घेता उत्कृष्टरित्या व प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पुढील काळातही कुलदीप जाधव यांनी अविरतपणे अशीच उत्कृष्ट सेवा जिथे कार्यभार स्वीकारतील तिथेही करावी असे सांगत निकम यांनी कुलदीप जाधव गटविकास अधिकारी लय भारी असे कौतुक करत जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जाधव यांना प्रभारी अधिकारी म्हणण्यापेक्षा यांनी प्रभावी काम केले असे म्हणावे लागेल असा अधिकारी मोखाडा तालुक्यातील एकमेव अधिकारी असेल असा अधिकारी तालुक्यात तर सोडा पण जिल्ह्यातही शोधून सापडणार नाही असे मत उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी इतर सर्व विभागातील मान्यवरांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्या सदर समारंभात सभापती युवराज गिरंधले, मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, आरोग्य विकास विभागातील भरत गारे पंचायत समितीतील महिला बालविकास तसेच सर्वच विभागतील व कार्यालयातील त्यांचे सर्व सहकारी, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते