पोदार इंटरनॅशनल स्कूल,दौंड येथे दिपोत्सव व स्वरसंध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न

दौंड: पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड या ठिकाणी दीपावली निमित्त दिपोत्सव व स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने झाली. दीपावली म्हणजे प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. ‘अंधारावर प्रकाशाचा,वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय’ प्रतीक आहे.त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. यावेळेस संगीत विभागाचे प्रमुख श्री.संजय मोरे सर आणि प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गीते सादर केली. गीत गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.पालक दीपोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे, शिशुविभाग प्रमुख सौ.शकुंतला तोरस्कर, प्रशासक प्रमुख श्री.स्वप्नील जुमडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री.विजय अल्हाट सर यांनी व्यक्त केले

Leave a Comment

Read More