द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
पोदार इंटरनॅशनल स्कूल,दौंड या ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री.किरण फराटे व सौ.फराटे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोदार स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे यांनी भुषवले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने झाले.
पाहुण्यांच्या स्वागतप्रसंगी संगीत विभागाचे प्रमुख श्री.संजय मोरे सर यांनी स्वागत गीत गायले. यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती कणसे यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना पोदार स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना भारतीय सण, संस्कृती, परंपरांची माहिती व्हावी. यासाठी प्रशालेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेतले जातात असे त्यांनी सांगितले. यावेळेस विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी दांडियाचा मनमुराद आनंद घेतला.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे, उपमुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी रथ, शिशु विभागाच्या प्रमुख सौ.शकुंतला तोरस्कर, प्रशासक प्रमुख श्री.स्वप्नील जुमडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू पवार मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख श्री.अतुल चौधरी सर यांनी मानले.