दौंड (दि.30)– पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्र उत्सव उत्साही आनंददायी आणि अविस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला. दांडिया-गरब्याच्या तालावर सजलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा आनंदमय झंकाराने दुमदुमली.पारंपरिक पोशाख, रंगीबेरंगी दांडिया आणि सुरेल संगीताने कार्यक्रमाला अनोखीच शोभा प्राप्त झाली. विशेष आकर्षण ठरले ते ग्रेड ८ वीच्या विद्यार्थिनींचे देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे सजीव व कलात्मक नृत्यसादरीकरण, ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमावेळी विद्यालयातर्फे ‘नारीशक्तीचा गौरव’ करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवर महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले
. त्यामध्ये सायली शहा, वृषाली बोरकर, सना पाटील, डॉ. मीनल वागसकर, डॉ. भारती गिडवानी आणि सरिता झा यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्या सौ. स्वाती कणसे मॅडम उपप्राचार्या नीलम अग्रवाल, शिशुविभाग प्रमुख शकुंतला तोरसकर प्रशासक प्रमुख नितीन करे आणि कार्यक्रम समन्वयक अतुल मोरे उपस्थित होते. प्राचार्या सौ. स्वाती कणसे मॅडम यांनी यावेळी बोलताना “नवरात्र उत्सव हा केवळ पूजा-अर्चना नसून तो आपल्या संस्कृतीचे जतन, एकतेचे प्रतीक आणि आनंदाचा संगम आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी उत्साह, एकात्मता आणि परंपरेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.”
उत्सवात रंग भरले ते बेस्ट वेशभूषा आणि बेस्ट डान्स या स्पर्धांनी. या स्पर्धांमध्ये केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर पालक आणि शिक्षकांचाही सहभाग होता. शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो, असे मत व्यक्त केले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षक सोनू पवार आणि अॅबिगिल डिक्रूझ यांनी केले, तर आभारप्रदर्शन सॅंड्रा मॅडम यांनी मानले