द महाराष्ट्र न्यूज टीम दौंड
योगेश्वरी फाउंडेशन दौंड आयोजित योगेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा २०२५ मध्ये दौंड पोदार प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळी करत तृतीय क्रमांक मिळविला. 
‘योगेश्वरी चषक क्रिकेट’ हि स्पर्धा दौंड योगेश्वरी फाउंडेशनद्वारा तालुक्यातील १३ वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. यासारख्या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते सदर स्पर्धेमध्ये पोदार प्रशाला दौंडसह तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे तसेच उपमुख्याध्यापिका नीलम अग्रवाल यानी मुलांचे कौतुक केले. यासाठी प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री विशाल पवार ,वृषाली माने, विद्या घडशी यांनी मार्गदर्शन केले.