।जदौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमादरम्यान प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी आराध्या भागवत ,समर्थ वाघमारे, निष्का जवळे या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रशालेतील महिला शिक्षिका हेमलता बारगल मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगून मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील शिक्षक-विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी राजे घडविले म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले तर स्वामी विवेकानंद हे आजच्या युवकांचे प्रेरणास्थान आहे त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सदर कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती कणसे मॅडम, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.(द महाराष्ट्र न्युज टीम दौंड)