विद्यार्थ्यासह शिक्षक पालकांनी घेतला मनमुराद आनंद.
दौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड या प्रशालेत दरवर्षी प्रमाणे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये करण्यात आले होते. सकाळ सत्रामध्ये इयत्ता पहिली ते चौथी यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष जालिंदर आवारी सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रेखा नरुटे मॅडम आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू यांनी भूषविले
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने झाली .पाहुण्यांच्या स्वागतप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी जीवनामध्ये खेळाचे स्थान व महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका नाईक मॅडम व हर्षल पोतदार सर यांनी केले ,तर आभार प्रदर्शन आकांक्षा मॅडम यांनी केले .तसेच दुपार सत्रामध्ये इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम जावळे सर ,रामचंद्र नातू सर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. रवींद्र सर राष्ट्रीय कुस्ती पंच यांनी भूषविले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्षांनी कुस्ती खेळाचे महत्व सांगितले कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ असून या खेळाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे विद्यार्थ्यांना आव्हान केले सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रदर्शन केले
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ड्रिल व डिस्प्लेचे सादरीकरण करण्यात आले, इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीनी योगा प्रात्यक्षिक सादर केले, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पिरामिड प्रात्यक्षिक सादर केले, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ लेझीम सादर केला, इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी परेड प्रात्यक्षिक केले तसेच विद्यार्थ्यांनी कवायत ,योगासने, मनोरा , ,झांज , नानचक्कू ,लाठी -काठी यांसारख्या खेळांचे प्रात्यक्षिक केले. विद्यार्थ्यांची शंभर व दोनशे मीटर तसेच रीले रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री .विशाल पवार सर, वृषाली माने मॅडम,विद्या घडशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम शिशुविभागाचे प्रमुख सौ शकुंतला तोरस्कर ,प्रशासक श्री. स्वप्नील जुमडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू पवार मॅडम निकिता शिंदे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतुल चौधरी सर यांनी केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.(द महाराष्ट्र न्युज टीम दौंड)